ताज्या बातम्या

Sugarcane Rate : ‘‘सिद्धेश्‍वर’चा पहिला हप्ता २१०० रुपये’

यंदाचा ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी गाळप हंगाम आहे. तो यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी परिपक्व ऊस गाळपासाठी पाठवावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सिद्धेश्‍वर सहकारी साखर (Siddheshwar Sugar Factory) कारखाना यंदा गाळपास येणाऱ्या उसाला (Sugarcane crushing) पहिला हप्ता प्रतिटन २१०० रुपये आणि अंतिम दर (Sugarcane Rate) कमीत कमी २६०० रुपये देईल,’’ अशी घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केली. ‘‘यंदाचा ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी गाळप हंगाम आहे. तो यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी परिपक्व ऊस गाळपासाठी पाठवावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ या ५० व्या हंगामातील ऊसगाळपाचा प्रारंभ अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. त्याप्रसंगी काडादी बोलत होते.

काडादी म्हणाले, ‘‘गेल्या हंगामात उसाचे उच्चांकी गाळप केले. त्यामुळे उताराही चांगला मिळाला. यंदा पाऊस चांगला झाल्याने पाण्याची अडचण भासणार नाही. चालू हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट मोठे आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. यंदा गाळपास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन २१०० रुपये दिला जाईल.

शेवटी साखरेचा उतारा पाहून २६५ जातीच्या वाणाला २५०० रुपये किंवा त्याहून अधिक तसेच इतर सुधारित वाणाला २६०० रुपये अथवा त्याहून अधिक अंतिम दर देण्यात येईल. इथेनॉल, सीएनजीसह सर्व उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प सुरू करणार असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर देण्याचा प्रयत्न राहील.’’

 ‘शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय’

‘‘दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांत साखर कारखान्याची गरज ओळखून शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी ‘सिद्धेश्‍वर’ची उभारणी केली. सिद्धेश्‍वरांच्या नावाने असलेल्या या कारखान्याने लौकिक निर्माण करतानाच पावित्र्यही जपले आहे. इतर कारखान्यांपेक्षा उसाला जास्तीचा दर मिळावा, अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते. परंतु ती मागणी करण्याची वेळ काडादी यांनी कधीच येऊ दिली नाही. आतापर्यंत त्यांनी सर्वोत्तम दर दिला. यापुढेही त्यांच्याकडून शेतकरीहिताचेच निर्णय होत राहतील,’’ असा विश्‍वासही आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT