Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

अखेरीस अकोला जिल्हा अधीक्षक पदाचा पदभार डॉ. इंगळेंनी स्वीकारला

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच आत्मा प्रकल्प संचालकपदाचा पदभार स्वीकारण्यावरून सुरू असलेला गोंधळ अखेरीस संपुष्टात आला आहे. डॉ. मुरली इंगळे यांनी सोमवारी (ता.सात) पदभार स्वीकारला.

Team Agrowon

अकोला ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agricultural Officer) तसेच आत्मा प्रकल्प संचालकपदाचा पदभार स्वीकारण्यावरून सुरू असलेला गोंधळ अखेरीस संपुष्टात आला आहे. डॉ. मुरली इंगळे यांनी सोमवारी (ता.सात) पदभार स्वीकारला.

विद्यमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा आजारपणाच्या कारणाने रजेवर गेल्यामुळे या पदाचा प्रभार कुणाकडे द्यायचा, याचा पेच विभागीय कृषी सहसंचालकांना पडला होता. त्यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्या नावे पत्र काढून पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, आधीच जिल्हा परिषदेत रिक्त पदे असल्याने या दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळणे शक्य नसल्याचे इंगळे यांनी वरिष्ठांना कळवले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच आत्मा प्रकल्प संचालक पदाचा प्रभार द्यायला पात्र अधिकारीच जिल्ह्यात नव्हता. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा पत्र काढून डॉ. इंगळे यांना पदभार घेण्याची सूचना केली. त्यानुसार इंगळे यांनी सोमवारी हा पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद तसेच शासनाच्या कृषी विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. इंगळे यांच्याकडेच सर्व पदांची जबाबदारी आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा इतर कारणांनी पद रिक्त झाले, की त्याचा पदभार द्यायलसुद्‍धा जिल्ह्यात जबाबदार अधिकारी नसल्याची दुर्दैवी परिस्थिती बनलेली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून ही परिस्‍थिती झालेली असून गेल्या काळात कृषिमंत्री दादा भुसे यांनी रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन दिले होते. पण ते पदावरून गेले मात्र अधिकारी काही मिळाले नाहीत. आता नवीन सरकारचा चार महिन्यांचा कार्यकाळ होऊ घातला आहे. रिक्त पदांमुळे जिल्ह्यात कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा बोऱ्या वाजत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT