Soybean  Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer For Soybean : सोयाबीनसाठी खतांचा वापर शिफारशीप्रमाणे करावा

Soybean Management : सोयाबीन साठी खतांचा वापर शिफारशीप्रमाणे करावा असा सल्ला लातूर येथील, कृषी महाविद्यालयाचे वनस्पती कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे यांनी दिला.

Team Agrowon

Latur News : सोयाबीन साठी खतांचा वापर शिफारशीप्रमाणे करावा असा सल्ला लातूर येथील, कृषी महाविद्यालयाचे वनस्पती कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे यांनी दिला.

रमेगाव ता. औसा जि. लातूर येथे सोयाबीन व्यवस्थापनावर ॲग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल यांच्यावतीने सोयाबीन व्यवस्थापन या विषयावर सोमवारी (ता. 28) सकाळी हनुमान मंदिर सभागृहात चर्चासत्र घेण्यात आले.

या चर्चासत्रात लातूर येथील, कृषी महाविद्यालयाचे वनस्पती कीटक शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे यांनी सोयाबीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

डॉ. भामरे म्हणाले, की शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये खतांचा वापर शिफारशी प्रमाणे करावा. सोयाबीन घेत असताना शेतकऱ्यांनी पीक फेरपालट करणे आवश्यक आहे. फवारणी करत असताना सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केले.

उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न व शंका विचारून माहिती जाणून घेतली. कोरोमंडल इंटरनॅशनलचे लातूर जिल्हा प्रतिनिधी रामदास सूर्यवंशी यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीची वाटचाल सांगून पिकासाठी आवश्यक असणाऱ्या खतांबाबत माहिती दिली.

यावेळी उपसरपंच अजित शेळके, राजेंद्र पाटील, सुधीर शेळके, धीरज पाटील, बंकट फावडे, शेतकऱ्यांसह कोरोमंडल इंटरनॅशनल चे रघुराम अरीगल्ला, अजित पासमे, विकास शिंदे उपस्थित होते. ॲग्रोवनचे प्रतिनिधी बालाजी थोडसरे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी शेळके यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT