Fertilizer stock Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Stock : गोंदियामध्ये दोन लाख रुपयांचा खत साठा जप्त

Illegal Fertilizer Sale : विनापरवाना खत विक्री करणाऱ्या दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापेमारी करीत दोन लाख रुपयांचा खत साठा जप्त करण्यात आला.

Team Agrowon

Gondia News : विनापरवाना खत विक्री करणाऱ्या दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापेमारी करीत दोन लाख रुपयांचा खत साठा जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या पथकाने गोरेगाव तालुक्‍यातील मुंडीपार येथे ही कारवाई केली.

गोरेगाव तालुक्‍यातील मुंडीपार व हेटी (पालेवाडा) येथील दोन विक्रेते विनापरवाना खत विकत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे त्यांनी दोन्ही ठिकाणी जात माहितीची खातरजामा केली.

त्यानंतर दोन्ही व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापेमारी करण्यात आली. यात नोंदणी प्रमाणपत्र न घेता व अनधिकृत जागेतून दोन जण खताची विक्री करीत असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने या दोन्ही विक्रेत्यांकडून दोन लाख रुपयांचा खत साठा जप्त केला.

त्यासोबतच दोन्ही आरोपींविरोधात खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्‍यक वस्तु अधिनियम १९५५, भारतीय दंड विधान कलम ४२३,३४ अन्वये गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

जप्त करण्यात आलेले हे खत विनायक इंडिया बायो फर्टिलायझर्स प्रा. लि. (घटबिलोड, जि. धार, मध्य प्रदेश) या कंपनीचे आहे. ५० किलो वजनाच्या १५० बॅग, प्रती बॅग १२९० याप्रमाणे १ लाख ९३ हजार ५०० रुपये अशी जप्त खताची किंमत आहे.

विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी एम. के. मडामे, कृषी अधिकारी राजेश रामटेके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यसलव बावनकर, पी. डी. कुर्वे, अतुल येडे यांनी ही कारवाई केली.

४५ कृषी केंद्रांना विक्री बंदी

कृषी विभागाने जिल्हयातील कृषी केंद्रांना भेटी देत तपासणीअंती त्रुटी आढळल्याने ४३ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत, तर दोन कृषी केंद्रांवर फौजदारी कारवाई करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT