snake bite  Agrowon
ताज्या बातम्या

Snake Bite : शेतकऱ्यांनो, सर्पदंशापासून घ्या काळजी

पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतात काम करताना शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. गवतातून चालताना पायात बूट घालावेत. उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्यक आहे.

टीम ॲग्रोवन

मंचर, जि. पुणे ः ‘‘पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतात काम करताना शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. गवतातून चालताना पायात बूट घालावेत. उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्यक आहे. घरात जमिनीवर झोपणे टाळावे. झोपेच्या आधी अंथरूण तपासावे. योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश (Snake Bite) व त्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. याबाबत समाजात जनजागृती करण्याचे काम आशा सेविकांनी करावे,’’ असे आवाहन जागतिक सर्पदंश समितीचे तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत (Dr. Sadanand Raut) यांनी केले.’’

मंचर (ता. आंबेगाव) येथे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन प्रकल्पांतर्गत सर्पदंश टाळण्यासाठी व सर्पदंश झाल्यानंतर तातडीच्या उपाय योजनेबाबत आंबेगाव तालुक्यातील २५० आशा सेविका, सार्वजनिक स्वास्थ्य अधिकारी, गटप्रवर्तक यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी डॉ. राऊत बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सर्पदंश तज्ज्ञ डॉ. पल्लवी राऊत या वेळी उपस्थित होत्या. या वेळी शून्य सर्पदंश प्रकल्पाचा माहितीपट दाखविण्यात आला.

डॉ. पल्लवी राऊत म्हणाल्या, ‘‘पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दोन हजार ५०० आशा सेविकांना सर्पदंश टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे जनजागृती झाल्यानंतर सर्पदंश व मृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत होईल. सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात नेले पाहिजे. याबाबत जनजागृती हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे.’’

‘‘गेली ३० वर्षे डॉ. राऊत दाम्पत्य यांच्यामुळे सर्पदंश झालेल्या हजारी रुग्णांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. त्यांच्या शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहकार्य करणार आहेत,’’ असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. डॉ. तुषार पवार यांनी आभार मानले.

भारतामध्ये दर वर्षी २७ लाख लोकांना सर्पदंश होतो. ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण गरीब तरुण शेतमजूर, महिला व मुले असतात. पावसाळ्यात याबाबत गाव व वाड्या वस्त्यांवर जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.
डॉ. सदानंद राऊत, तज्ज्ञ, जागतिक सर्पदंश समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरुन सांगलीच्या नागेवाडी, भाग्यनगरमध्ये तणाव, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीसाठी चांदूरबाजार येथे आंदोलन

Rahuri Farmers Protest: कांदादर, संपूर्ण कर्जमाफीसाठी राहुरीत ‘रास्ता रोको’

Banana Farmers Demand: तक्रार नोंदवू न शकलेल्या केळी उत्पादकांनाही मदतीची मागणी

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

SCROLL FOR NEXT