Sugarcane Trash
Sugarcane Trash Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Trash : उसाचे पाचट न जाळण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

Team Agrowon

चिखलठाण, जि. सोलापूर : कृषी विभागाच्या (Agriculture Department) प्रबोधनानंतर शेटफळ (ता. करमाळा) येथील ऊस उत्पादक (Sugarcane Producer) शेतकऱ्यांनी उसाचे पाचट न जाळण्याचा निर्धार केला.

शेतकऱ्यांना शेतावर जाऊन कृषी विभागाच्यावतीने उसाचे पाचट कुजण्याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात ऊस पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, आजही ऊसतोडणी झाल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट पेटवून देतात. यामुळे पर्यावरणाच्या हानीबरोबरच शेतकऱ्यांचे नुकसान होते. उसाचे पाचट राखण्याचे फायदे लक्षात घेऊन, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात सध्या ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबविण्यात येत असून करमाळा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे मार्गदर्शनाखाली शेटफळ येथे माहिती देण्यात आली.

कृषी विभागाच्या रोहिणी सरडे यांनी उपस्थितांना पाचट राखण्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तर कृषी सहायक सुप्रिया शेलार यांनी कृषी विभागाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती एकत्र मिळवण्यासाठी कृषक ॲपचा वापर करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.यावेळी उसाच्या एक एकर क्षेत्रामधील पाच ते सहा टन पाचटापासून दोन ते तीन टन उत्तम कंपोस्ट खत मिळते.

पाचट ठेवल्याने पाणी वीज यामध्ये बचत होऊन मशागतीचा खर्चही कमी होतो.यावेळी असल्याने पाचट कुजवण्याच्या विविध पद्धतीची माहिती देऊन उसाचे उत्पादन पाच ते सहा टनाची वाढ होत असल्याने योग्य पाचट व्यवस्थापनाची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीमती सरडे यांनी यावेळी केले. उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह तांत्रिक माहिती देण्यात आली.यावेळी सरपंच विकास गुंड, सुनील पोळ, नागनाथ शेतकरी गटाचे वैभव पोळ, मकाई साखर कारखान्याच्या शेती विभागाचे ॲग्री सुपरवायझर प्रशांत नाईकनवरे, बाळासाहेब पोळ, नानासाहेब साळुंके, राजेंद्र साबळे, सुहास पोळ लहू पोळ यांच्यासह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT