Farmer Protest Agrowon
ताज्या बातम्या

Farm Road : शेतरस्त्यासाठी बैलजोडीसह बेमुदत उपोषण सुरूच

सिंगणापूर येथील शेतकऱ्याची आमडापूर (ता. परभणी) शिवारातील गट क्रमांक २८८ मध्ये २० एकर जमीन आहे. या ठिकाणी रस्ता ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे चार वर्षांपासून १४ एकर जमीन पडीक आहे.

Team Agrowon

परभणी ः शेतामध्ये ये-जा करण्यासाठी महसूल विभागाने (Revenue Department) रस्ता (Farm Road) उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी सिंगणापूर (ता. परभणी) येथील चार शेतकरी परभणी येथे मंगळवार (ता. २४)पासून उपोषणास (Farmer Protest) बसले आहेत.

यावर तोडगा न निघाल्यामुळे रविवारी (ता. २९) सहाव्या दिवशी उपोषण सुरू होते. दरम्यान विठ्ठल खिल्लारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सिंगणापूर येथील शेतकऱ्याची आमडापूर (ता. परभणी) शिवारातील गट क्रमांक २८८ मध्ये २० एकर जमीन आहे. या ठिकाणी रस्ता ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे चार वर्षांपासून १४ एकर जमीन पडीक आहे. शेतीमाल वाहतुकीसह अन्य कामांसाठी अडचणी येत आहे.

हे शेतकरी शेत रस्त्यासाठी २०१५ पासून महसूल विभागाकडे मागणी करत आहेत. परंतु आजवर रस्ता उपलब्ध करून न दिल्यामुळे सिंगणापूर येथील विठ्ठल खिल्लारे, श्रीरंग खिल्लारे, सदाशिव खिल्लारे, प्रदीप खिल्लारे बैलजोडीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. २४) बेमुदत उपोषणास बसले आहेत.

शनिवारी (ता. २८) विठ्ठल खिल्लारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महसूल विभागाकडून यावर या ठोस तोडगा काढला जात नसल्याने रविवारी सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे, असे श्रीरंग खिल्लारे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT