Farmer Protest : शेतकरी महापंचायतमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च

Team Agrowon

दोन वर्षांपूर्वी २६ जानेवारी २०२१ ला ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचे दोन वर्ष पूर्ण झाले.

Farmer Protest | Agrowon

त्यानिमित्ताने २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीच्या सीमांवर १ लाख ट्रॅक्टर्सवर ५ लाख स्त्री-पुरुष शेतकऱ्यांची विशाल परेड काढण्यात आली.

Farmer Protest | Agrowon

या परेडमध्ये सर्व किसान संघटनांसोबत अखिल भारतीय किसान सभेच्या हरियाणा आणि पंजाब राज्यांचा त्यात सहभाग होता.

Farmer Protest | Agrowon

जिंद, हरियाणा येथे संयुक्त किसान मोर्चातर्फे (एसकेएम) विशाल महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. 

Farmer Protest | Agrowon

जिंदच्या महापंचायतीत मोदी-प्रणित भाजप सरकारच्या 'वादाखिलाफीचा' (विश्वासघाताचा) तीव्र निषेध करण्यात आला.

Farmer Protest | Agrowon

किफायतशीर आधारभावाची कायदेशीर हमी, शेतकरी-शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती व त्यांना वाढीव पेन्शन, वीज दुरुस्ती विधेयक रद्द करणे, पीक विमा योजनेत आमूलाग्र शेतकरीधार्जिणे बदल, या शेतकऱ्यांच्या उर्वरित ज्वलंत मागण्यांसाठी देशभर आंदोलन जास्त तीव्र करण्याची हाक देण्यात आली. 

Farmer Protest | Agrowon
Sharad Pawar | Agrowon