Jalyukt Shiwar Scheme
Jalyukt Shiwar Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session 2023 : शेततळे योजनेचा विस्तार, जलयुक्त शिवारला संजीवनी

Team Agrowon

Maharashtra Budget Session 2023 मुंबई - राज्य सरकारच्या गुरूवारी (ता.९) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात (Budget Session) मागेल त्याला शेततळे योजनेच्या (Farm Pond Scheme) विस्ताराची घोषणा करतानाच जलयुक्त शिवार योजनेला (Jalyukt Shiwar Scheme 2.0) दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने संजीवनी देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच महत्त्वाच्या योजना आणि तरतुदींच्या घोषणाही करण्यात आल्या.

राज्य अर्थसंकल्पातील तरतुदी/योजना

‘मागेल त्याला शेततळे’चा विस्तार...

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा व्यापक विस्ताराची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर, या योजनेवर १००० कोटी रुपये खर्च करणार.

गोसेवा आयोग...

- देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार

- आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार

- देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ

- विदर्भ-मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांत दुग्ध विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १६० कोटी रुपये

- नगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय

जलयुक्त शिवार २.०

- जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ५००० गावांमध्ये

- गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस ३ वर्षे मुदतवाढ

काजूवर प्रक्रिया, फळ विकास योजना- २०० कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड, उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंड प्रक्रिया केंद्र

- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना, ५ वर्षांसाठी १३२५ कोटी रुपयांची तरतूद

स्वतंत्र शेतकरी सुरक्षा अनुदान

- राज्य सरकारची स्वतंत्र गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना २ लाख रुपयांपर्यंत लाभ

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार, ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणणार, १००० जैवनिविष्ठा स्रोत केंद्र स्थापन करणार, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ, ३ वर्षांत १००० कोटी रुपये निधी

- आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’ राबविणार आहे. याकरिता २०० कोटींची तरतूद, सोलापुरात श्रीअन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार

कृषी सुविधा केंद्र, संत्राप्रक्रिया केंद्र

- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार, यासाठी २२८ कोटींची तरतूद.

- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्‍वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलडाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /२० कोटींची तरतूद

बाजार समितीत निवारा-भोजन

- राज्यातील बाजार समितींत शेतकऱ्यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन आणि जेवणासाठी शिवभोजन थाळी

पूरक व्यवसाय मदत

- महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणार, नगर येथे मुख्यालय. याशिवाय राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी.

मच्छीमारांसाठी योजना

- प्रकल्पग्रस्त मासेमार कुटुंबांकरिता प्रकल्पाच्या २ टक्के वा ५०

कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोषचे निर्माण. मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या १२० अश्‍वशक्तीची अट काढली, २६९ कोटी रुपयांची तरतूद.

ट्रान्स्फॉर्मर योजना

- शेतकऱ्याची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर योजना. याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ वाढविणार. प्रलंबित ८६,०७३ कृषिपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च २०२४ पर्यंत

सिंचन/पाणी

...असे असतील नदीजोड प्रकल्प

- दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून

- नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील पाणी वापरणार

- मुंबई, गोदावरी खोऱ्यांतील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार

- मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ

- वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांना लाभ

सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार

- गेल्या ८ महिन्यांत २७ सिंचन प्रकल्पांना सुप्रमा

- चालू २६८ पैकी ३९ प्रकल्प या वर्षी पूर्ण करणार

- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील ६ प्रकल्प या वर्षी पूर्ण करणार

- बळीराजा जलसंजीवनी योजनेतील २४ प्रकल्प पूर्ण करणार

- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास या वर्षी १५०० कोटी, जून २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार

- कोकणच्या सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खारभूमी बंधाऱ्यांच्या कामांना गती

पाण्यासोबत स्वच्छताही...

- जलजीवन मिशन : १७.७२ लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे २०,००० कोटी रुपये

- १०,००० कि.मी.च्या मलजलवाहिनी

- ४.५५ कोटी मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया - ग्रामीण भागात १५,१४६ घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

‘लेक लाडकी’ योजना

- मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात

- पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ

- जन्मानंतर मुलीला ५००० रुपये, पहिलीत ४००० रुपये, सहावीत ६००० रुपये, अकरावीत ८००० रुपये, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये मिळणार.

- राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत

- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार

- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर

- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर

- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना

- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण

आशा, अंगणवाडी सेविका

- आशा स्वयंसेविकांचे मानधन ३५०० वरून ५००० रुपये

- गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० वरून ६२०० रुपये

- अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरून १०,००० रुपये

- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरून ७२०० रुपये

- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४२५ वरून ५५०० रुपये

- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

आरोग्य निधीत वाढ

- महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ ४ लाखांपर्यंत, राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी...

- २५० शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार

- अनुसूचित जमातीच्या १०० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती

अल्पसंख्याकांसाठी...

- अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांत ३००० बचत गटांची निर्मिती

- उच्च शिक्षण घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती : २५,००० वरून ५०,००० रुपये

रस्त्यांसाठी निधी...

- रस्ते व पुलांसाठी १४,२२५ कोटी रुपये, यातून १०,१२५ कि.मी.चे कामे, २०३ पूल व मोऱ्यांची कामे

- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : ४५०० कि.मी./३००० कोटी रुपये - प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : ६५०० कि.मी.

- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना

- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना

- आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी ४००० कोटी

कौशल्यविकास

- ५०० ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम

- विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ, विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार, इयत्ता ५ ते ७ वी : १००० वरून ५००० रुपये, तर ८ ते १० वी : १५०० वरून ७५०० रुपये

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन

- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : ६००० वरून १६,००० रुपये

- माध्यमिक शिक्षण सेवक : ८००० वरून १८,००० रुपये

- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : ९००० वरून २०,००० रुपये

सौरऊर्जा...

- २०,००० ग्रामपंचायतीत सौरऊर्जा प्रकल्प

- जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरऊर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती

- शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट

- प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती

- ग्रामीण भागात कडुनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन

- धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई

- औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी ५० हायटेक रोपवाटिका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT