Export Agrowon
ताज्या बातम्या

Export Business : निर्यातक्षम उद्योग उभारण्यासाठी सुविधा द्याव्यात ः डॉ. तुम्मोड

जिल्ह्यात जमीन, वीज, पाणी आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील या पोषक स्थितीमुळे याठिकाणी अनेक निर्यातक्षम उद्योग उभे राहू शकतात.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : ‘‘जिल्ह्यात जमीन, वीज, पाणी आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील या पोषक स्थितीमुळे याठिकाणी अनेक निर्यातक्षम उद्योग (Export Business) उभे राहू शकतात. हे उद्योग उभारणीसाठी सुविधा पुरविण्यात याव्यात,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र, आजारी उद्योग पुनर्वसन, जिल्हा सल्लागार समिती आणि स्थानिक लोकांना रोजगार समितीची बैठक पार पडली. ते बोलत होते. खामगाव आणि चिखली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांची जागेची मागणी असल्यामुळे याठिकाणी अतिरिक्त वसाहतीसाठी प्रयत्न करण्यात यावेत.

नवीन वसाहतीसाठी जमिनी घेताना थेट खरेदीद्वारे जमीन घेण्यावर भर द्यावा. या ठिकाणी उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्याचा विकास होण्यास मदत मिळेल. खामगाव येथील उद्योगांना ग्रामपंचायत आणि औद्योगिक विकास महामंडळ या दोघांकडून कराची आकारणी होत आहे. यावर नियमानुसार महामंडळाने करवसुली करून त्यातील ५० टक्के कर हा ग्रामपंचायतीला वितरित करण्याच्या सूचना केल्या.

उद्योगांसाठी वीज आणि पाणी महत्त्वाचे आहे. वीज वारंवार खंडित झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याने विजेचा पुरवठा अखंडित होण्यासाठी वीज मंडळाने कार्य करावे. तसेच पाण्याची सोय होणे महत्त्वाचे आहे. उद्योगाच्या ठिकाणी सांडपाणी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात याव्यात. आजारी उद्योगांसाठी शासकीय योजना आहेत. याचाही लाभ देण्यात यावा. निर्यात वाढविण्यासाठी सहकाऱ्यांना सोबत घेऊन उद्योग उभारणी करावे, असे आवाहनही डॉ. तुम्मोड यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT