Akola Grampanchayat
Akola Grampanchayat Agrowon
ताज्या बातम्या

Akola Grampanchayat : अकोला जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या २६६ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक

टीम ॲग्रोवन

अकोला ः (Akola) येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक (State Election)आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर (Kiran Kurandikar)यांनी दिले आहेत.

त्यानुसार अकोला जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या सुमारे २६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया होणार आहे. कोविड काळात विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या.

आता राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदान याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणुकीसाठी सुमारे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस-जशा संपतील तसतसे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT