ताज्या बातम्या

Millet Exhibition : बाजरी भरडधान्यनिर्मित विविध पाककृती स्पर्धा, प्रदर्शन

नागरिकांनी आहारात भरडधान्याचा वापर करण्याचे आवाहन

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : बाजरी (Bajara) या भरडधान्यापासून बनविलेल्या विविध पाककृतींची स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्‍घाटन मध्यवर्ती इमारत येथील कृषी आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता. १३) राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते, आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, मृद्‍संधारण संचालक रवींद्र भोसले, कृषी प्रकिया संचालक सुभाष नागरे, गुणवत्ता नियंत्रण संचालक दिलीप झेंडे,

विस्तार व प्रशिक्षण सहसंचालक सुनील बोरकर, स्मार्टचे प्रकल्प व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर आदी उपस्थितीत होते.

या वेळी कृषी आयुक्त श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘पौष्टिक भरडधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच भरडधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.

त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘मकर संक्रांती भोगी’ हा दिवस ‘पौष्टिक भरडधान्य दिवस’ म्हणून घोषित केला आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने १ जानेवारी २०२३ रोजी सिल्लोड कृषी महोत्सवाचे आयोजन केले. तृणधान्याचे आहारातील महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.’’

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वातावरणीय बदल, आहारात बदल झाल्याने नागरिकांना कर्करोग, मधुमेह, श्‍वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

म्हणून नागरिकांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे वळण्याची गरज आहे.

या सर्व बाबींचा विचार करता राज्यातील नागरिकांनी भरडधान्य दिवस साजरा करण्याचे आवाहन कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी केले.

प्रदर्शनात एकूण १५ स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये बाजरी या भरडधान्यापासून बनविण्यात आलेले लाडू, हलवा, बर्फी, वडी, थालिपीठ, शिरा, उपमा, उसळ, पोहे, चिवडा, चकली, धपाटे असे सुमारे ७५ प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: घाटमाथा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Agriculture Workshop: ‘केव्हीके’च्या पुढाकाराने हळद, सफेद मुसळी लागवड, निर्यातीवर कार्यशाळा

Village Development: गावाच्या गरजा पाहूनच विकासकामे करणे आवश्‍यक: माजी सरपंच शेखर

Drought Like Conditions: दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत बुलडाण्यातील १३ तालुके

Ravikant Tupkar: दुष्काळी मदतीसाठी हेक्टरी एक लाख द्या: रविकांत तुपकर

SCROLL FOR NEXT