Talathi Bharati 2023 agrowon
ताज्या बातम्या

Talathi Bharti 2023 : तलाठी पदाची परीक्षा १७ ऑगस्टपासून

Maharashtra Talathi Recruitment 2023 : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने तलाठी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा येत्या १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत.

Team Agrowon

Maharashtra Talathi Bharti Exams 2023 : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने तलाठी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा येत्या १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान १० दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे.

परीक्षेचे पत्र आणि केंद्र तीन दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी माहिती दिली.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४ हजार ४६६ या पदासाठी ११ लाख १० हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळांचा समावेश आहे.

उमेदवारांना परीक्षेचे गाव आणि ऑनलाइन अगोदर समजणार असून, परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर हॉल तिकिटाबरोबरच दिसणार आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यात येणार असून टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

...असे आहे वेळापत्रक

टप्पा -- तारीख

पहिला टप्पा -- १७ ते २२ ऑगस्ट

दुसरा टप्पा -- २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

तिसरा टप्पा -- ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Administration Plan: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज

Paddy Prices Drop: मळणीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचा डाव

Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’ला पाठिंबा, पण मोबदला दहा पट द्या !

Kharif Sowing Planning: वर्ध्यात ४.१९ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

Shirapur Irrigation Project: शिरापूर योजनेच्या कामाची गती संथ

SCROLL FOR NEXT