Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Market : सोयाबीन हमी केंद्रांचा ‘पत्ता गुल’ ऑक्टोबर संपला तरी धोरण नाही

निर्णय होण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : सोयाबीन खरेदीसाठी (Soybean) दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात हमी केंद्र सुरू केली जातात. यंदा सरकारच्या गोंधळात अजूनही खरेदी केंद्राबाबत निर्णय झालेला नाही. शासनाकडून सेंटर आयडी आणि पासवर्ड आलेले नसल्याने केंद्र बंद आहेत. सोयाबीन शेतकऱ्यांच्या (Soybean Farmers) घरात यायला सुरुवात झाली असून, आतातरी केंद्राबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यात १७ हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केले जातात. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी केंद्र सुरू केले जातात. यंदा शेतकरी अडचणीत असतानाही सोयाबीन हमीभाव केंद्राबाबत निर्णय झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहे.

सरकार असले तरी गोंधळाची स्थिती दिसून येते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचे हमीभाव केंद्र उघडले जातात. यंदा ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू झाला; मात्र केंद्राबाबत अजूनही आदेश आलेले नाही. किंबहुना सोयाबीनची नोंदणीही सुरू झालेली नाही. सोयाबीन ओले असल्याने आधीच भाव कमी होत आहे. त्यात केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांकडून दराबाबत मनमानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खुल्या बाजारात हमी दरापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खासगी बाजारात शेतमाल विक्रीला पसंती दिली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हमी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची पसंती खासगी बाजारपेठेला जास्त आहे. खासगी बाजारात चारशे ते पाचशे क्विंटल आवक होत आहे. काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.

ज्वारीसाठी जिल्ह्यात पाच केंद्रे

शासनाने यंदा ज्वारीसाठी पाच हमीभाव केंद्रे निश्‍चित केली आहेत. ज्वारीला दोन हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने जाहीर केला. ज्वारीसाठी केंद्र निश्‍चित झाले आहे. मात्र, सोयाबीन या महत्त्वाच्या पिकासाठी अजूनही हमीभाव केंद्र सुरू करण्याबाबत शासनाकडून हालचाल दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून

Water Storage: गिरणा धरण १०० टक्के भरले; रब्बी हंगामातील पिकांना दिलासा

Farmers Foreign Study Tour: राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी, ४ कोटी निधी मंजूर

Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT