Yavatmal Rain Agrowon
ताज्या बातम्या

Yavatmal Heavy Rain : यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणीबाणी

Team Agrowon

Nagpur News : यवतमाळ जिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी व संततधार पावसाचा फटका बसला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वदूर हाहाकार उडाला असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.

महागाव तालुक्‍यातील आनंदनगर तांडा हे चौफेर पाण्याने वेढल्याने या गावातील ४५ व्यक्‍ती पुरात अडकल्याने त्यांच्या सुटकेसाठी भारतीय हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३६ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस पडत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका महागाव तालुक्‍याला बसला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात ११७ मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यवतमाळ २३६.२, महागाव २३१, आर्णी १६४, घाटंजी १४२, कळंब, दारव्हा, दिग्रस या तालुक्ं‍यामध्ये १०० मिलीमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. वाघाडा परिसरातील काही नागरिकांचे प्रशासनाकडून स्थलांतरण करण्यात आले. महागाव तालुक्‍यातील धानोडा, खडका, पेढी या भागांत ४० ते ५० व्यक्‍ती पुरात अडकले होते.

त्यांना प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पूरस्थिती हाताबाहेर जात असल्याच्या परिणामी प्रशासनाकडून एनडीआरएफचे दोन पथक बोलावण्यात आली आहेत. यवतमाळ शहरातील रस्त्यावर साचलेले पाणी काही प्रमाणात ओसरले असले तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी लाणार आहे.

महागाव तालुक्‍याचा विचार करता शिरफुली येथे पैनगंगा नदीचे पाणी काठावरील गावे तसेच घरांमध्ये शिरले. कुपटी नाल्यावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटला. राहूर कडे येणाऱ्या नाल्याची देखील हीच स्थिती आहे.

तालुक्‍यातील स्थिती

वाघनाथजवळ पूल खचल्याने त्यात ट्रक अडकला.

खडका येथील शीप नदीला पूर आल्याने नागपूर-तुळजापूर महागार्ग बंद.

खडका येथे वच्छलाबाई सुरोशे या वृद्ध महिलेच्या अंगावर भिंत पडल्याने गंभीर जखमी.

तिवरंग गावाला पुराचा वेढा; ४० व्यक्‍तींना सुरक्षीतस्थळी हलविले.

करांजखेड गावात पाणी शिरले. पिकाचे सर्वाधिक नुकसान.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT