Fodder
Fodder  Agrowon
ताज्या बातम्या

Animal Exhibition : राज्यस्तरीय पशुप्रदर्शनात अठरा प्रकारच्या चाऱ्यांचे प्रदर्शन

Team Agrowon

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
नगर ः शिर्डी (जि. नगर) येथे होत असलेल्या देशपातळीवरील पशुप्रदर्शनात पशुपालकांना पशुधनाच्या दूध उत्पादन (Milk Production) वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या विविध १८ प्रकारच्या चाऱ्याचे प्रदर्शन (Fodder Exhibition) व त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

येथे तीन दिवसांत देशभरातून सुमारे १० लाख लोक भेटी देतील त्या अनुषंगाने नियोजन केले असल्याचे सांगितले.

शिर्डीत होणारे हे प्रदर्शन (महाएक्सपो ः २०२३) सुमारे ४६ एकर क्षेत्रावर राहणार असून देशात सर्वात मोठे प्रदर्शन असेल, असा दावा पशुसंवर्धन विभागाकडून केला जात आहे.

शिर्डी (जि. नगर) येथे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून २४ ते २६ मार्च या कालावधीत देश पातळीवरील पशुप्रदर्शन (महाएक्सपो ः २०२३) होत आहे. देशातील सर्वत्र हे प्रदर्शन भरविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस आहे.

शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर जागेत हे प्रदर्शन भरणार असून विविध जातीच्या देशभरातील पाच हजार पशुसह राज्यातील ३५ जिल्ह्यांतून पशू बाबत माहिती देणारे ५०० पेक्षा अधिक स्टॉल असतील.

तीन दिवसांत दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत.

५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. प्रदर्शनाला येणाऱ्या पशुपालक व पशुप्रेमींच्या वाहन पार्किंग व्यवस्थेसाठी १०० एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे.

देशातील १३ पेक्षा जास्त राज्यातील पशुपक्षी व पशुपालक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. दूध उत्पादक, शेळी-मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे असणार आहे.

दूध उत्पादनात वाढ, शेळ्या-मेंढ्यांना जोपासण्यासह त्यांची वेगाने वाढ होण्यासाठी चारा महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनासाठीच्या चाऱ्याबाबत माहिती मिळावी यासाठी विविध प्रकाराच्या १८ चारा पिके व बियाण्याचे प्रदर्शन असणार आहे.

दूध उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे असलेल्या मुरघास, ॲझोला, हॉयड्रोपोनिक्स चाऱ्याचे नवीन तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन करून जनावरांना हिरवा चारा कसा उपलब्ध करून देण्यात येईल.

याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात असेल असे नगरमधील पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंबारे यांनी सांगितले.


प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्ये दाखवणार
महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचे पशुसंवर्धनविषयक वैशिष्ट्यांची माहिती सर्वसामान्य जनतेसाठी खुली असणार आहे.

शिवाय त्या त्या राज्यातील व जिल्ह्यातील प्रसिद्ध तसेच वैशिष्ट्यपूर्ण पशुधन या प्रदर्शना प्रत्यक्ष सहभागी असणार आहे.

गायी, म्हैस, शेळी - मेंढी, कोंबडी, श्वान, वराह, अश्व असा विविध पशुप्राण्याचे ‍विविध प्रकारांतील सर्वोत्कृष्ट प्रजाती पाहायला मिळतील. शेतकरी, पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणारे वैरण विकास, दूग्ध व्यवसायातील आवाहने, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन याविषयांवरील तांत्रिक चर्चासत्र याठिकाणी होणार आहेत.

या चर्चासत्रांमधील चर्चांमध्ये शेतकरी सहभागी होऊ शकतात. पशुसंवर्धनविषयक नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT