Khadkpurna Water Project Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न होणार

बुलडाणा : जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची उंची वाढविण्यासाठी प्रकल्प ज्या खोऱ्यात आहे, त्या खोऱ्यातील जलसंपत्ती मालकी हक्क असलेल्या महामंडळाची पाणी उपलब्धतेबाबत व प्रस्तावित बांधकामाविषयी सहमती आवश्यक आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची (Khadkpurna Dam) उंची वाढविण्यासाठी प्रकल्प ज्या खोऱ्यात आहे, त्या खोऱ्यातील जलसंपत्ती मालकी हक्क असलेल्या महामंडळाची पाणी उपलब्धतेबाबत (Water Availability) व प्रस्तावित बांधकामाविषयी सहमती आवश्यक आहे. ती सहमती घेऊन धरणाची उंची (Dam Hight) वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे लेखी उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी आमदार श्‍वेता महाले यांच्या तारांकित प्रश्‍नाला दिले.

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या एकूण प्रस्तावित २० हजार ७२० हेक्टर इतक्या सिंचन क्षेत्रामधून १६७३ इतके सिंचन क्षेत्र लाभधारकांच्या विरोधामुळे नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये रद्द करण्यात आले आहे. रद्द सिंचन क्षेत्राकरिता १.३१ दलघमी पाण्याची बचत होणार आहे.

तसेच या प्रकल्पाच्या दरवाजांना ०.३० मीटरचे फ्लॅप बसविल्यास सुमारे ९.१४६ दलघमी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. आमदार महाले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ५ सप्टेंबर २०२२ रोजी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. मागणी आणि उपस्थित केलेल्या प्रश्‍नाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खडकपूर्णा धरणात फ्लॅप बसविल्यास अतिरिक्त ९.१४६ दलघमी पाणीसाठा निर्माण होऊ शकतो.

ही बाब सुद्धा मान्य केली असल्याने खडकपूर्णा धरणाच्या दरवाजांना ०.३० मीटरचे फ्लॅप बसविण्याबाबत शासन लवकरच कार्यवाही करेल अशी आशा आहे.खडकपूर्णा प्रकल्पाला दरवाजांना ०.३० मीटरचे फ्लॅपमुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. वाढलेल्या जलसाठ्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT