Milk Producers Union Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon Dairy : महाविकास, भाजप, शिंदे गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. यातच संघाचे सभासद खेमचंद महाजन यांनी दोन्ही गटांतील १८ उमेदवारांविरुद्ध दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या (Jalagaon Dairy Election) संचालकपदाच्या निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. यातच संघाचे सभासद खेमचंद महाजन (Khemchand Mahajan) यांनी दोन्ही गटांतील १८ उमेदवारांविरुद्ध दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

यातच संघाच्या निवडणुकीतून राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन माघार घेण्याची शक्यता आहे. सर्वच पदे आपल्या घरात यावरून एकनाथ खडसे व महाजन यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला. यामुळे महाजन आपल्या समर्थकास पुढे करून या निवडणुकीतून बाहेर पडतील, असे दिसत आहे.

निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट, अशी लढत होणार आहे. दोन्ही गटांनी आता कंबर कसल्याचे दिसत आहे. अगदी आरोप- प्रत्यारोप ते थेट न्यायालयीन लढाई सुरू आहे. उमेदवारी माघार घेण्याची मंगळवारी (ता. २९) अंतिम मुदत आहे. मात्र आतापासून दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आघाडी व भाजप, शिंदे गटाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आघाडी व शिंदे गटाचे काही उमेदवार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी मुंबईत आपापल्या नेत्यांच्या भेटीगाठीदेखील या उमेदवारांनी घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, सभासद खेमचंद महाजन यांनी १८ उमेदवारींवर हरकत घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळून लावल्याने दोन्ही गटातील उमेदवारांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT