E Peek Pahani Agrowon
ताज्या बातम्या

E Peek Pahani : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून राजुरी येथे ई-पीक नोंदणी

ई-पीक पाहणीद्वारे विविध पिकांच्या लागवडीच्या नोंदीचा फायदा विमा आणि नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाईसाठी होतो.

टीम ॲग्रोवन

आळेफाटा, जि. पुणे ः ई-पीक पाहणीद्वारे (E Peek Pahani) विविध पिकांच्या लागवडीच्या (Crop Cultivation Registration) नोंदीचा फायदा विमा (Crop Insurance) आणि नैसर्गिक आपत्तीमधील (Natural Calamity) नुकसान भरपाईसाठी होतो. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणे अत्यावश्‍यक आहे. मात्र शेतकऱ्यांना तंत्रज्ञान माहीत नसल्याने शेतकरी नोंद करू शकत नाही.

यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यासाठी राजुरी (ता.जुन्नर) येथे ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय, बेल्हे (बांगरवाडी), राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या साह्याने ई-पीकपाहणी व नोंदणी करण्यात आली.

गावातील प्रत्येक पिकाची नोंद होण्यासाठी प्रत्येक मळा, शिवार, वाड्या-वस्त्या या ठिकाणी ५-५ विद्यार्थ्यांचे गट करून सोबत ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य यापैकी जे उपलब्ध असतील त्यांना बरोबर घेऊन १ हजार ११ शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी व नोंदणी करण्यात आली. या नोंदीमुळे शेतकऱ्यांना पीएम शेतकरी योजना नुकसान भरपाई /शासन अनुदान, सोसायटी कर्ज, बँककर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे सरपंच प्रिया हाडवळे व उपसरपंच माऊली शेठ शेळके यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना तलाठी धनाजी भोसले, राहुल कुमावत, नितीन औटी, सचिन औटी यांनी ई-पीक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या वेळी नीलेश हाडवळे, किरण जाधव, सुजित बनकर, पांडुरंग औटी, विलास सरोदे, सचिन गटकळ, प्रतीक औटी, नामदेव औटी, जालिंदर औटी, अतिश औटी, गणेश हाडवळे, विकास कणसे, संतोष हाडवळे, मच्छिंद्र हाडवळे, अमोल बांगर, स्वप्नील हाडवळे, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तर राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. विपुल नवले, प्रा. प्रदीप गाडेकर, प्रा. अरविंद ढोबळे, प्रा. अमोल दिघे, प्रा. भूषण दिघे आणि राष्ट्रीय सेवा योजेनेचे ५५ विद्यार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT