Dussera Melava  Agrowon
ताज्या बातम्या

Dussera Melava : दसरा मेळाव्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना

शिंदे गटाची मदार ग्रामीण भागावर; ठाकरेंचे टीझरमधून आक्रमक आव्हान

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यातील सत्तातरानंतरचा राजकारणाचा दुसरा अंक दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत पाहायला मिळणार आहे. शिवसेना (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना (Uddhav Thakrey) असा हा अंक असून, दोन्ही गटांची जय्यत तयारी सुरू आहे.

शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांनी मतदार संघात मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. बीकेसी मैदानावर ग्रामीण भागातील गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. तर उद्धव ठाकरे यांनी टीझरच्या माध्यमातून आक्रमक आव्हान दिले आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. विधिमंडळ पक्ष, लोकसभेतील बहुमत, विविध राज्यांच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा वारंवार केला आहे.

शिवतीर्थावरील उद्धव ठाकरे यांच्या परंपरागत मेळाव्याला शह देण्यासाठी बीकेसी मैदानावर शिंदे गटाने मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. त्याचा टीझरही प्रसिद्ध झाला असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या क्लिप त्यामध्ये आहेत. शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार मतदार संघांत मेळावे घेत असून, त्यांतून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली जात आहे.

शिवतीर्थावरील सभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणले जाणार असल्याचा आरोपही केला जात आहे. बीकेसी मैदान भरण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी मतदारसंघातून आराम बसेस बुक केल्या असून, त्याचे पार्किंग मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये केले जाणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात होणाऱ्या आरोपांचा समाचार त्याचवेळी घेण्याचे नियोजनही केले आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहतील, असे नियोजन केले आहे. त्यामुळे गोरेगाव येथील गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर दिल्लीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले तसेच नियोजन केले आहे.

शिवसेनेच्या मराठी बाण्याला मराठी गरब्याने उत्तर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्यांना महत्त्व आहे. शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने मराठी दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. यासाठी सिनेस्टार्सना आमंत्रित केले होते. या गरब्यासाठी मोठी गर्दीही झाली होती.

टीझरमधून ठाकरेंना डिवचले

शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी तयार केलल्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या क्लिप दाखविण्यात आल्या आहेत. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा व्हिडिओही प्रसिद्ध करून डिवचले आहे. ‘निष्ठा विचारांशी, लाचारांशी नाही’ अशी टॅगलाइन शिंदे गटाने तयार केली आहे. तर ‘कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, कुणी केला तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय रहायचे नाही.’ असे आव्हान देणारा टीझर शिवसेनेने प्रसिद्ध केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम

SCROLL FOR NEXT