Ujani Canal Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Canal Burst : उजनीचा डावा कालवा फुटला, परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातून सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यासाठी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सुरू आहे.

Team Agrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातून (Ujani Dam) सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन (Rabi Irrigation) सोडण्यात आले आहे. त्यासाठी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून (Ujani Canal) पाणी सुरू आहे.

पण रविवारी (ता. २९) पाटकूलनजीक (ता. मोहोळ) गंगाधर सातपुते यांच्या वस्तीनजीक डावा कालवा फुटल्याने परिसरातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

उजनी धरणातून शेतीसाठी १८ जानेवारीपासून डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले आहे. सुरुवातीला पाणी कमी वेगाने सोडले जात होते.

पण त्यात फारसा अडथळा येत नसल्याने पाण्याचा वेग वाढवण्यात आला होता. वास्तविक, डाव्या कालव्याची पाण्याची वहन क्षमता १४०० क्युसेक इतकी आहे. तसेच सध्या १२५० क्युसेक इतकेच पाणी सोडले जात आहे.

तरीही अचानकपणे कालवा फुटल्याने परिसरातील द्राक्ष, उसाच्या शेतीत हे पाणी शिरले आणि मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असा थेट शेतात शिरल्याने त्याला थांबवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला.

अगदी काही तासांतच काढणीला आलेल्या ऊस, द्राक्ष बागांमध्ये पाणीच पाणी साठले, तसेच कालव्यावरील आणि काहींच्या विहिरीवरील शेतीपंपही वाहून गेले. जलसंपदा विभागाला ही माहिती कळताच, कालव्यातील पाणी तूर्त बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

नुकसानीचे पंचनामे करणार

फुटलेल्या कालव्याच्या ठिकाणी लोखंडी दरवाजे टाकून पाणी अडवले जाईल आणि कालव्याची तातडीने दुरुस्ती केली जाईल. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना योग्य ती भरपाई देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी माहिती लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT