कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर (Rain Intensity Kolhapur) मंगळवारी (ता.९) दुपारपर्यंत सुरूच राहिला. जोरदार पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी (River Overflowed) पात्र बाहेर पडले आहे. विविध नद्यांवरील एकूण ७१ बंधारे (Barrage Under Water) दुपारी दोन वाजेपर्यंत पाण्याखाली गेले. पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बहुतांशी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) केले आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत गगनबावड्यात सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस झाला.
पंचगंगा नदीची पातळी मंगळवारी दुपारी एक वाजता राजाराम बंधारा येथे ३७ फूट ७ इंच इतकी होती. या ठिकाणी इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फूट आहे. कृष्णा-वारणा नद्यांच्या पाणीपात्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे खुले झाले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बहुतांश शेतीकामे ठप्प झाली आहेत. विशेष करून पश्चिमेकडे जोरदार पाऊस असल्याने मशागतीची कामे करणे अशक्य होऊन बसले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व नद्यांमधून अलमट्टी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेक प्रतिसेकंद इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. वारणा धरणातून ५ हजार क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता कायम असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांत तब्बल सत्तरहून अधिक बंधारे पाण्याखाली गेल्याने बहुतांश गावची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण १८ मार्ग पाणी आल्यामुळे बंद आहेत. अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा जादा पाऊस झाला. यामध्ये आंम्ब्यामध्ये १९०, भुदरगड तालुक्यातील कडगावात १५७, आजारात तालुक्यातील गवसेमध्ये १३० मिमी पाऊस झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.