Heavy Rain
Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात ४५५ किमींचे रस्ते खरडले

टीम ॲग्रोवन

नागपूर : अतिवृष्टी (Heavy Rain) व पुरामुळे (Flood) शेतपिकांसह इतर आर्थिक हानी (Crop Damage) मोठ्या प्रमाणात झाली आहे. रस्त्यांचेही नुकसान (Road Wash Away Due To Heavy Rain) झाले. जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे ४५५ किमींचे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १२८ कोटींची गरज आहे. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

जुलै व ऑगस्ट महिन्यात महिन्यांत अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाल्यांना पूर आले. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अनेकांचे जीवही गेले. जनावरेही वाहून गेली. तर काहींचा वीज पडून मृत्यू झाला. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचेही नुकसान झाले. जिल्‍हा परिषद अंतर्गत हजार किमींपेक्षा अधिकचे रस्ते येतात. यातील ४५५ किमींचे रस्ते खराब झाले आहेत. यातील १०८ किमींचे रस्ते हे इतर ग्रामीण रस्ते, तर ३४६ किमींचे ग्रामीण रस्ते आहेत. हे रस्ते खराब झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. ते दुरुस्त न झाल्यास अधिक खराब होतील.

या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी ३७ कोटी ६ लाखांची, तर कायम स्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी १२८ कोटी ३१ लाखांची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.

दुरुस्तीचे ३६४ कोटी थकीत

दरवर्षी अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून निधीच मिळत नाही. २०१६ ते १०२१ काळात रस्ते दुरुस्तीसाठी ३६४ कोटींच्या मागणीचे प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात आले. परंतु एकही रुपया शासनाकडून देण्यात आला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT