Kolhapur Rain Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain : कोल्हापुरात ‘दूधगंगा’त ५८ टक्के; तुळशी धरणात ५४ टक्के साठा

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीची पाणीपातळी गुरुवारी दुपारी दोनपर्यंत ४०.७ फूट होती. जिल्‍ह्यातील ८२ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले होते.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) सायंकाळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. राधानगरी धरणाचे पाणी पंचगंगा नदीत येण्‍यास प्रारंभ झाल्याने नदीच्या पातळीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत किंचित वाढ दिसून आली. पंचगंगा नदीची पाणीपातळी गुरुवारी दुपारी दोनपर्यंत ४०.७ फूट होती. जिल्‍ह्यातील ८२ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले होते. त्यातून ७००० क्युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरू होता. पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्‍याने नद्यांचे पाणी धीम्या गतीने वाढत असल्‍याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी स्‍थलांतराला सुरुवात केली नव्‍हती.

सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातही अद्‍याप कुणीच स्‍थलांतरास प्राधान्य दिले नाही. मात्र प्रशासनाने निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. ग्रामस्‍थांनी तातडीने स्थलांतराला प्राधान्‍य द्यावे, असे आवाहन केले आहे.

वारणा (चांदोली) धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्‍याने वारणा नदीचे पाणीही वाढण्याची शक्यता निर्माण झाले. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मात्र अत्यंत धीम्या गतीने वाढ होत असल्‍याने कृष्णा काठची चिंता सध्‍या तरी कमी आहे.

पण अन्य नद्यांचे पाणी वाढत असल्याने पुराची धास्‍ती मात्र कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील धरणांचा सरासरी साठा ७५ टक्यांचा झाला आहे. दूधगंगा ५४ तर तुळशी धरणाचा पाणीसाठा ५८ टक्के झाला आहे. इतर सर्व धरणात सरासरी ८० टक्क्यांपर्यंत साठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT