Dr. Rajendra Shingane  Agrowon
ताज्या बातम्या

Rajendra Shingane : विदर्भ मार्केटिंग फेडरेशन अध्यक्षपदी डॉ. शिंगणे यांची फेरनिवड

विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची व उपाध्यक्षपदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती झाली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या (Vidarbh Marketing Federation) अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांची व उपाध्यक्षपदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती झाली आहे. विदर्भाच्या सहकार क्षेत्रात ही एक महत्त्वाची संस्था मानली जाते. डॉ. शिंगणे दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी (ता. २५) अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. यात डॉ. शिंगणे व आमदार धोटे यांची बिनविरोध निवड झाली.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत असलेले डॉ. शिंगणे यापूर्वीही या संस्थेचे अध्यक्ष राहिले आहेत. संस्थेचे सुमारे २१ संचालक आहेत. या संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. विदर्भात सहकार क्षेत्रात या संस्थेचे काम आहे.

विदर्भ मार्केटिंग फेडरेशन ही शेतकऱ्यांची विदर्भातील सर्वांत मोठी संस्था आहे. राज्यात या संस्थेचे नाव आहे. सहकारात काम करणाऱ्या खरेदी-विक्री संस्था, जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचे काम केले जाते. नव्याने आता राईस मिल टाकणार आहोत. एनपीकेची फॅक्टरी उभारत आहोत. गेल्या पाच वर्षांत संस्थेला पुढे नेण्याचे काम केले. आगामी काळात संस्थेचे कामकाज, खरेदी-विक्रीमध्ये सहभाग वाढवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचे धोरण कायम राहणार आहे.

- आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, अध्यक्ष, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT