PD Agriculture university Agrowon
ताज्या बातम्या

Akola University : ‘पंदेकृवि’ला मिळाले पूर्णवेळ कुलसचिव

PD Agriculture University : अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सुधीर राठोड हे कुलसचिव म्हणून रुजू झाले आहेत.

Team Agrowon

Akola News : अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सुधीर राठोड हे कुलसचिव म्हणून रुजू झाले आहेत. ते यापूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. नुकतीच शासनाने त्यांची नियुक्ती केली असून ते रुजू झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत या विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव पदावर अधिकारी मिळत नव्हता. त्यामुळे हा कारभार प्रभारींच्या खांद्यावर सुरू होता. मध्यंतरी म्हणजेच मे महिन्यात या पदावर अकोल्याचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रतिनियुक्तीने शासनाने बदली केली. मात्र त्यांना येथे रुजू न करता ताटकळत ठेवण्यात आले.

अखेर त्यांना आता उपविभागीय अधिकारी म्हणून यवतमाळ जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे. तर कुलसचिव म्हणून राठोड यांची नियुक्ती झाली. विद्यापीठाचे विदर्भातील ११ जिल्ह्यांचे मोठे कार्यक्षेत्र आहे. विद्यापीठ प्रशासकीय कारभारासोतच परीक्षा, शिक्षण, नियुक्ती प्रक्रिया, बदल्या, विद्यापीठाची जमीन, मालमत्तेचा कस्टोडिअन म्हणून हे पद महत्त्वाचे मानले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT