Pune APMC
Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

APMC News : राज्यात बाजार समित्यांचे विभाजन, काहींचे विलीनीकरण

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC Election) ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र राज्य शासनाने अचानक काही बाजार समित्यांचे विभाजन (APMC Division) तर काही समित्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बाजार समिती हद्दीतील निवडणुकांचे काय होणार? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्ष या- ना त्या कारणामुळे रखडल्या होत्या. या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्याची दखल घेत न्यायालयाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २८ आणि ३० एप्रिल अशा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळांची १४९ वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. त्यात राज्यातील काही बाजार समितीचे विभाजन तर काहींचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परिणामी, या बाजार समित्यांमधील संचालक मंडळाच्या निवडणुका स्थगित कराव्यात, अशी विनंती ‘पणन’चे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला केली आहे.

विलीनीकरण आणि विभाजनाची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या स्तरावर होईल. परिणामी या बाजार समितीच्या निवडणुका स्थगित कराव्यात, असे पत्रात म्हटले आहे.

विभाजन व विलीनीकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर तेथील संचालक मंडळाच्या निवडणुका नियमाप्रमाणे यथावकाश घ्याव्यात, असेही नमूद आहे.

वर्धा जिल्ह्यातील आष्टी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या समिती अंतर्गत कारंजा घाडगे हा उपबाजार आहे. या बाजार समितीसाठी ६१ अर्ज दाखल झाले. त्यातील दोन अर्ज छाननीत बाद झाले. सध्या ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

...अशी होणार कार्यवाही

- खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर) बाजार समितीचे लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये विलीनीकरण.

- कुंटूर (नांदेड) बाजार समितीचे नायगाव (बा) बाजार समितीमध्ये विलीनीकरण.

- बोदवड (जळगाव) बाजार समितीचा उपबाजार वरणगावचा समावेश भुसावळ बाजार समितीत करणे.

- आष्टी (वर्धा) बाजार समितीचे विभाजन करून कारंजा घाडगे येथे स्वतंत्र बाजार समितीची स्थापना करणे.

शासनाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (पुणे) यांना पत्राद्वारे आष्टी बाजार समिती विभाजनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका स्थगितीची विनंती केली आहे. अद्याप त्या संदर्भातील कोणत्याही सूचना प्राप्त नाहीत. त्यामुळे नियमानुसार निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जात आहे.
- प्रकाश भजाणी, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT