Solapur News  Agrowon
ताज्या बातम्या

Solapur News : एकाच दिवसात हजाराहून अधिक दाखल्यांचे वितरण

‘शासन आपल्या दारी’ व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, उत्तर सोलापूरच्या वतीने गुरुवारी (ता.१८) आयोजित महाशिबिरास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Team Agrowon

Solapur News : ‘शासन आपल्या दारी’ व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, उत्तर सोलापूरच्या वतीने गुरुवारी (ता.१८) आयोजित महाशिबिरास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या एका दिवसात विविध प्रकारच्या जवळपास १०३१ दाखल्यांचे वितरण विद्यार्थी, पालक आणि शेतकऱ्यांना कऱण्यात आले.

नॉर्थकोट प्रशाला, पार्क चौक येथे १८ ते २६ मे या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर आदी दाखले देण्यात येत आहेत.

यासोबतच पंचायत समिती व कृषी विभाग यांनीही या महाशिबिरामध्ये सहभाग नोंदवून आपल्या विभागाच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना वाटप केले. या महाशिबिराला जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते काही प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या शिबिरात एकूण ६४० उत्पन्नाचे दाखले, ७५ जातीचे दाखले, ४८ नॉन क्रिमीलेअर दाखले, ३३ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखले, १६८ रहिवासी दाखले देण्यात आले.

त्याशिवाय कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत सहा लाभार्थी, राष्ट्रीय कृषी विकास योजनांचे पाच लाभार्थी, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना वैयक्तिक शेततळे पाच लाभार्थी, आत्मा अंतर्गत महिला बचत गट एक लाभार्थी यांना पूर्व संमतिपत्र देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Sugar Factory: राज्यात ७४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली; पहिल्या सप्ताहात २५ लाख टन गाळप

Rabi Season Preparation: दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामाची तयारी; कृषी विभागाकडून रब्बीचे ६४ लाख हेक्टरवर नियोजन

Paddy Price: गोंदिया जिल्ह्यात धानाच्या दरात तेजी? भाव पोहोचले ४ हजार ५०० रुपयांवर

Agristack Farmer ID: देशात ११ कोटी फार्मर आयडी तयार; पाच महिने आधीच लक्ष्य पूर्ण, कृषिमंत्र्यांची माहिती

Maharashtra Weather: वादळी प्रणालीमुळे विदर्भासह राज्यात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT