Free Food
Free Food Agrowon
ताज्या बातम्या

Free Food : हिंगोली जिल्ह्यात मोफत अन्नधान्याचे वितरण

Team Agrowon

हिंगोली : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना २०२२ मधील मार्च आणि एप्रिल ते जूनमध्ये मोफत अन्नधान्य (Distribution of Free Food) वितरित करण्यात आले.

त्यासाठी नफा रक्कम रास्तभाव दुकानदारांना वितरणासाठी तालुकानिहाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ही रक्कम रास्त भाव दुकानदारांना अदा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मार्च २०२२ (प्रत्यक्ष वितरण माहे एप्रिल २०२२ अखेर) तसेच एप्रिल ते जून २०२२ (प्रत्यक्ष वितरण माहे एप्रिल ते जुलै २०२२)

या कालावधीमध्ये वितरित केलेल्या मोफत गहू व तांदळापोटी शिधावाटप, रास्तभाव दुकानदार यांना देय असलेल्या मार्जिनची रक्कम वितरित करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातर्फे निधी दिला आहे.

२०२२ मधील मार्च महिन्याचे वितरण एप्रिलमध्ये झाले. एप्रिल ते जूनचे वितरण एप्रिल ते जुलैमध्ये झाले. त्या रास्तभाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम वितरणासाठी निधी दिला.

त्यात हिंगोली तहसील कार्यालयाला ७ लाख ९० हजार २९८ आणि ३८ लाख ४८ हजार ५८९ असे एकूण ४६ लाख ३८ हजार ८८७ रुपये दिले.

तर कळमनुरी तहसील कार्यालयाला ५७ हजार ८०१ आणि ३२ लाख १६ हजार ५४३ असे एकूण ३२ लाख ७४ हजार ३४४ रुपये, वसमतसाठी २ लाख १६ हजार ९६८ आणि ४४ लाख ९१ हजार १७४, असे एकूण ४७ लाख ७ हजार ९११ रुपये, औंढा नागनाथसाठी ४ लाख २४ हजार ९६८ रुपये

आणि ३१ लाख ०२ हजार ४९० असे एकूण ३५ लाख २७ हजार ४५८ रुपये, सेनगावसाठी १ लाख १३ हजार ६०६ आणि ३१ लाख ८५ हजार ७६० असे एकूण ३२ लाख ९९ हजार ३६६ रुपये वितरित करण्यात आले.

प्राप्त रक्कम रास्तभाव दुकानदारांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सक्त सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT