Ethanol Rate Agrowon
ताज्या बातम्या

Ethanol Rate : इथेनॉलच्या दरवाढीत केंद्र सरकारकडून भेदभाव

साखर उद्योगाची टीका; उसापासून होणाऱ्या इथेनॉल दरातील वाढ अपुरी

Team Agrowon


राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात (Ethanol Rate) वाढ केली असली, तरी इतर पदार्थांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलपेक्षा उसाचा रस व सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात अपेक्षेपेक्षा कमी वाढ केल्याने साखर उद्योगात नाराजी पसरली आहे.

उसाचा रस व सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रति लिटर २ रुपये १६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे या इथेनॉलचा दर ६५ रुपये ६१ पैसे झाला आहे. तो ७० रुपयांपर्यंत असावा, अशी अपेक्षा होती. पण केंद्र सरकारने दरात फारशी वाढ केली नाही. केंद्राने या दरवाढीवर फेरविचार करावा, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केली आहे.

साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राने बी हेवी मोलॅसिस व सी हेवी मोलॅसिसपासून तयार केलेल्या इथेनॉलच्या दरात चांगली वाढ केली आहे. पण ऊस रस अथवा सिरपपासून तयार केलेल्या इथेनॉलला या तुलनेत कमी दरवाढ करून भेदभाव केला आहे. हा विरोधाभास अनाकलनीय असल्याचे मत साखर तज्ज्ञांचे आहे.

ऊस रस व सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला तुलनेने खर्च जादा आहे. यापासून सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी जादा खर्च येतो. मोलॅसिसपेक्षा किमान तो लिटरला पाच रुपयांनी जादा आहे. विशेष म्हणजे उसाचा रस किंवा सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन होते. यामुळे साखर तयारच होत नाही. परिणामी, रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला जादा दर मिळाल्यास अतिरिक्त साखरनिर्मिती कमी होऊ शकते. पण शासनाने याचा विचार न करता रसापासून किंवा सिरपपासून होणाऱ्या इथेनॉलला इतर घटकापासून तयार होणाऱ्या इथेनॉलपेक्षा कमी दर दिला. यामुळे उद्योगात नाराजी आहे.

कोट ः
इथेनॉल दरवाढीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; मात्र हा निर्णय परिपूर्ण नाही. उसाच्या रसापासून व सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. या दरात भरघोस वाढ झाली असती तर साखर उद्योगाला ते फायदेशीर ठरले असते. अशा भेदभावामुळे निर्मितीला अपेक्षित गती येणार नाही, अशी भीती आहे. केंद्राने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करत आहोत.
- संजय मोहंती, महासंचालक, ‘इस्मा’.

सर्वांच्या दृष्टीने उसाच्या रसापासून तयार होणारा इथेनॉल फायदेशीर आहे. त्यासाठी येणारा खर्च पाहिला तर सध्या जाहीर केलेला दर कमी असल्याचे दिसते. इथेनॉलची दरवाढ जाहीर करताना या सर्व बाबींचा विचार व्हावा असे वाटते.
- विजय औताडे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT