Almatti Dam Agrowon
ताज्या बातम्या

अलमट्टीतून ६० हजार क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पावसाचे पाणी अलमट्टीत गतीने येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : पावसाळ्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अलमट्टी धरणाच्या (Almatti Dam) पाणीसाठ्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणामध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याची (Water Inflow In Almatti dam) आवक सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पावसाचे पाणी अलमट्टीत गतीने येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. कोल्हापूर व सांगली पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांमार्फत अलमट्टीच्या पाणी साठ्यावर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

अलमट्टीची प्रकल्प क्षमता १२३.८ टीएमसी आहे. मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंत ८७.९९२ टीएमसी म्हणजेच ७१.०७ टक्के पाणीसाठा धरणात होता. धरणात १ लाख ४ हजार ८५२ क्युसेक आवक होत असून ६० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी जवळील हिप्परगी धरणामधून ७५ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. अलमट्टीमुळेच दक्षिण महाराष्ट्रात पूर येत असल्याचा समज असल्याने अलमट्टीतून जास्तीत जास्त पाणी सोडण्याचे नियोजन करण्याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT