Shetkari Samvad
Shetkari Samvad Agrowon
ताज्या बातम्या

Sheatkari Samvad : सांगवी जोमदेव शेत शिवारात रंगला शेतकरी संवाद

Team Agrowon

अकोला ः बाळापूर तालुक्यातील मौजे सांगवी (जोमदेव) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (Agriculture Technology Management) यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) आरीफ शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम घेण्यात आला.

सरपंच सुजाता गवई, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. प्रकाश घाटोळ, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. गोपाळ मंजूळकर, जी. जे. तुपकर, तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने, आत्मा यंत्रणाचे व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, दत्तात्रेय काळे, रामकृष्ण सोनटक्के, डीआरपी गोपाळ मुठाळ, कृषी सहायक गोपाल राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. शेगोकार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गटनिर्मिती, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनेबाबत सविस्तरपणे माहिती दिली.

डॉ. गजानन तुपकर यांनी कांदापीक लागवड व व्यवस्थापन, कीड व रोगनियंत्रण, कांदा साठवणूक, विक्री आणि कांदा पिकाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा टिप्स सांगितल्या.

डॉ. प्रकाश घाटोळ यांनी हरभरा, गहू पिकांचे व्यवस्थापन व उन्हाळी तीळ लागवड व व्यवस्थापन या पिकाविषयी सविस्तरपणे माहिती देऊन शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे निरसन केले.

डॉ. मंजूळकर यांनी जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, शेतीपूरक जोडधंदे, या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गोपाल मुठाळ यांनी पंतप्रधान खाद्य उन्नयन योजनेविषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने यांनी विविध योजनांची माहिती दिली.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी दत्ता काळे, शिवाजी जाधव, कृषी सहाय्यक गोपाल राऊत, कृषिमित्र बाळू सिरसाठ, ज्ञानेश्वश्‍वर सांगोकार, गणेश लांडे, विश्‍वनाथ सोनटक्के, मोहन सोनटक्के व गावातील कांदा, लिंबू, भाजीपाला, उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT