swabhimani sanghatna Agrowon
ताज्या बातम्या

Drought conditions : सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : शिवसेना (ठाकरे) आणि ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Severe rain conditions : पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले, पण सातारा जिल्ह्यात अद्याप मोठ्या प्रकल्पांत  ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. अपवाद वगळता कुठेही जोरदार पाऊस झालेला नसल्याने समस्या वाढल्या आहेत.

Team Agrowon

satara News : सातारा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला असून, खरिपाचा पेराही पूर्ण क्षमतेने झालेला नाही. आता पावसाने दडी मारल्याने आलेले पीकही वाया जाण्याची भीती आहे. शेतकरी संकटात असताना नव्याने हे अस्मानी संकट उद्‌भवले आहे. सरकारने याची नोंद घेऊन जिल्ह्यात सर्कलनिहाय दुष्काळी जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. २४) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या  वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, जनार्दन आवारे, दिलीप पिसाळ, सुधाकर केसुगडे, विक्रांत जाधव, महेश साळुंखे, संतोष घाडगे, अजित निकम, शिवसेना ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख दत्ता नलवडे, तालुकाध्यक्ष रमेश बोराटे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील ऑगस्टची परिस्थिती पाहता पाऊस अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते कर्ज काढून शेतात पेरणी केली. ही पेरणी वाया चालली आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, तसेच शासनाच्या सोयीसवलती लागू कराव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT