Sugarcane Worker
Sugarcane Worker Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Worker : ऊसतोडणीसाठी पैशाची मागणी

Team Agrowon

पैठण, जि. औरंगाबाद : उसाचा हंगाम (Sugarcane Season) सध्या मध्यावर आला आहे. तालुक्यात दोन साखर कारखान्याच्या (Sugar Factory) माध्यमातून उसाचे गाळप सुरू आहे.

मात्र, येथील दोन्ही साखर कारखान्यात ऊस तोडणीसाठी (Sugarcane Worker Mukadam) सर्रास मुकादमांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मंत्री संदीपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी ऊस उत्पादकांकडून होत आहे.

पैठण तालुक्यात उसाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात लूट सुरू आहे. उसाची नोंदणी केली असताना कारखान्याचे कर्मचारी यंत्रणा सोडून मुकादम स्वतःच उसाचे फड ठरवीत आहेत.

हे मुकादम एकरी ५ ते १० हजार रुपयांची मागणी करत आहेत. तर, प्रत्येक बैलगाडीसाठी ३०० ते ५०० रुपयांचा दर ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लाखोंची लुट सुरू आहे.

यंदा टोळ्यांची संख्या कमी असल्याने कारखानदारांची अडचण झाली आहे. ऊसतोड मजूर कमी असल्याचा फायदा टोळीचा मुकादम घेत आहे.

दरम्यान, तोड करण्यासाठी शेतकरी उसाची लागण केल्यानंतर कारखान्यांकडे नोंद करतात. त्यानंतर ऊस परिपक्व झाल्यानंतर नोंदीनुसार ऊस तोडला जातो.

मात्र, या नियमाला मुकादमांनी हरताळ फासला आहे. कारखान्यांनी जरी टोळ्यांना अमुक एका परिसरातील ऊस तोडायचे निर्देश दिले तरी टोळी मुकादम जिकडे पैसे मिळतात तिकडचाच ऊस तोडत आहेत.

त्यामुळे आधी नोंदणी केली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या उसाची तोडच होत नसल्याची चित्र आहे.

आता जानेवारीची अखेर आल्याने मुकादमांनी त्यांचे दर वाढविलेले आहेत. मुकादम एक एकरातील ऊस तोडण्यासाठी तब्बल ५ ते १० हजार रुपयांची मागणी करत आहेत.

पैसे न दिल्यास या टोळ्या ऊसच तोडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव टोळ्यांना पैसे द्यावे लागत आहेत.

यामुळे मंत्री संदीपान भुमरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT