Land Record Agrowon
ताज्या बातम्या

Land Record : सात-बारावरील एमआयडीसीची नोंद हटवा; शिवसेनेचा रास्ता-रोको

मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीला जमीन देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षित क्षेत्र ही नोंद कमी करावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी (ता. ३) वडकबाळ येथे सोलापूर-विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

सोलापूर ः मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीला जमीन (MIDC Land) देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षित क्षेत्र ही नोंद कमी करावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी (ता. ३) वडकबाळ येथे सोलापूर-विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व उपजिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, पूजा खंदारे, बालाजी चौगुले, संतोष केंगनाळकर, रेवण बुकानरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती अप्पाराव कोरे, रमेश नवले, भीमाशंकर म्हेत्रे, सुरेश शेंडगे आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. उताऱ्यावरील एमआयडीसीला आरक्षित क्षेत्र ही नोंद कमी करण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू आहे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave Alert: विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Solapur Logistics Hub: सोलापूर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनणार

Urea Black Market: अनुदानित ५८ टन युरियाची काळ्या बाजारात विक्री

Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळ दूध दरात २ रुपयांची वाढ

Shaktipeeth Highway Project: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनात ‘एनए’चे रॅकेट ?

SCROLL FOR NEXT