Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यातील किमान तापमान घटलं

राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्याच्या खाली पोचले. तर बहुतांशी ठिकाणचं तापमान १८ अंश सल्सिअपेक्षा कमी आहे. त्यामुळे सकाळी थंडीचं प्रमाण वाढलं.

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीची चाहूल (Winter In Maharashtra) लागली आहे. सध्या राज्यात सकाळी किमान तापमानात (Minimum Temperature) घट होऊन दुपारी काहीशी वाढ झालेली दिसते. त्यामुळे सकाळी थंडी (Cold Weather) आणि दुपारी उन्हाचा चटका (Heat) जाणवतोय. सध्याचे वातावरण रब्बीच्या पेरणीसाठी (Rabi Sowing) पोषक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिलंय. राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू पेरणी (Wheat Sowing) सुरु केली आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्याच्या खाली पोचले. तर बहुतांशी ठिकाणचं तापमान १८ अंश सल्सिअपेक्षा कमी आहे.

त्यामुळे सकाळी थंडीचं प्रमाण वाढलं. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि महाबळेश्वर येथे सर्वात कमी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोल्हापूर येथे सर्वाधिक १७.४ अंश सल्सिअस किमान तापमान होते.

मराठवाड्यातही थंडीचं प्रमाण वाढलं. औरंगाबाद येथे विभागातील सर्वांत कमी १३.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होतं. तर नांदेड येथे विभागातील सर्वाधिक किमान तापमान १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहीलं.

विदर्भात किमान तापमान तुलनेत काहीसं जास्तच होतं. त्यामुळे थंडीचं प्रमाणही अनेक भागात कमी राहीलं. विदर्भात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ येथे १४.५ अंश सेल्सिअसवर होते. तर सर्वाधिक १७.७ अंश सेल्सिअस किमान तापमान अकोल्यात नोंदले गेले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT