Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीमुळे, रब्बी पिके, फळे, भाजीपाल्यांची नासाडी

Team Agrowon

Parbhani News परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडलात शनिवारी (ता. १८) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस (Rainfall) झाला.

शुक्रवारी (ता. १७) दुपारी तीन नंतर परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे (Hailstorm) हजारो हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा बीजोत्पादन पीक, केळी, आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू, टरबूज, खरबूज यासह शेवगा भाजीपाला पिकांची नासाडी (Crop Damage) झाली.

वीज कोसळून परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यातील चार व्यक्तींचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत.

परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १७) दुपारनंतर परभणी तालुक्यातील झरी मंडलातील साडेगाव, पेडगाव मंडळातील अनेक गावे, मानवत तालुक्यातील केकरजवळा मंडलातील मंगरूळ, सारंगपूर, रामपुरी, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव, गंगाखेड तालुक्यातील अनेक गावे, वाड्या, पूर्णा तालुक्यातील आवई, बरबडी, धानोरा काळे आदी गावशिवारात, जिंतूर तालुक्यातील काही गावे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

आवई (ता. पूर्णा) आणि हयातनगर (ता. वसमत) शिवारात गारपीट झाल्यामुळे रब्बी पिके, फळपीके, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकहानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज कोसळून चार व्यक्तींचा मृत्यू...

शुक्रवारी (ता. १७) दुपारी झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळल्यामुळे शेतात काम करत असलेल्या चार व्यक्तीचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये साडेगाव (ता. परभणी) येथील आबाजी नहातकर,शेळगाव (ता. सोनपेठ) येथील ओमकार शिंदे (वय १५), उखळी खुर्द (ता. गंगाखेड) येथील बाळासाहेब फड (वय ६), परसराम नागरगोजे (वय ४०) यांचा समावेश आहे.

जखमीमध्ये उखळी खुर्द शिवारात राहीबाई फड (वय ७५), सतीश नरवाडे (वय २९), राजेभाऊ नरवाडे (वय ३५), शेळगाव (ता. सोनपेठ) शिवारातील द्वारकबाई शिंदे (वय ४५) यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT