Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : लांजा तालुक्यात भातशेतीचे नुकसान

गेले चार दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. रविवारी (ता. १६) सायंकाळी पडलेल्या पावसामुळे भातशेतीला फटका बसला आहे.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः गेले चार दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) धुमाकूळ घातला होता. रविवारी (ता. १६) सायंकाळी पडलेल्या पावसामुळे भातशेतीला (Paddy Farming) फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील पालु येथे काजळी नदीचे (Kajli River) पाणी वाढल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले.

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने लांजा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. तयार झालेली भात पिके शेतातच उभी आहेत. पावसामुळे भात पीक कापायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

परतीच्या पावसाने लांजा तालुक्यातील पूर्व भागाला जोरदार दणका दिला. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कोसळलेल्या जोरदार पावसामुळे येथील काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले.

त्यामुळे तयार झालेले भात पीक हे पूर्णपणे पुराच्या पाण्याने आडवे झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंत जोरदार कोसळत होता. भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT