Crop Under Water Agrowon
ताज्या बातम्या

Vidarbha Crop Damage : विदर्भातील पाच जिल्ह्यांत सहा लाख हेक्‍टरवर नुकसान

Heavy Rains in Vidarbha : अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील गावांना फटका

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Heavy Rains Destroyed Crops : अमरावती ः विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत तब्बल सहा लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासनाला सादर केला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या काही मंडलांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस २४ तासांत कोसळला. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर येत त्याचे पाणी काठावरील शिवारात शिरले. पावसामुळे देखील अनेक शिवारात उभी पिके पाण्याखाली गेल्याने ती उद्ध्वस्त झाली. या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीसाठी पैशाची तजवीज करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात एकट्या यवतमाळ जिल्ह्यांत २ लाख ३७ हजार ८१३ हेक्‍टरवर नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये खरडून गेलेल्या ७२४९.१० हेक्‍टर क्षेत्राचाही समावेश आहे.

खरडून गेलेल्या भागातून सुपीक मातीही वाहून गेली, परिणामी या क्षेत्रात पीक घेणेही शेतकऱ्यांना आता शक्‍य होणार नाही, अशी स्थिती आहे. जिल्ह्यांमध्ये बुलडाणा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यांत १ लाख ६४ हजार ६७७ हेक्‍टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद या पिकांचे नुकसान नोंदविले.

बुलडाण्यात खरडून गेलेले क्षेत्र १२ हजार २६४ हेक्‍टर आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ३२० हेक्‍टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले तर ३६९७ हेक्‍टर जमीन खरडून गेली. अमरावती आणि वाशीम जिल्ह्यांत सर्वांत कमी नुकसान नोंदविण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात ४० हजार २१९ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

...अशी आहेत बाधित गावे

बुलडाणा ४५९

अकोला ५८३

वाशीम १२०

यवतमाळ १५३२

अमरावती ३५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

PESA : ‘पेसा’ क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा

Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

SCROLL FOR NEXT