Sugarcane Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Wild Boar Crop Damage : कळंबमध्ये उसाचे रानडुकरांकडून नुकसान

Wild Animal Crop Damage : मागील काही दिवसांपासून रान डुकराचे जत्थेच्या जत्थे उसाच्या फडात घुसून नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Crop Damage News : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पीक जगविताना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यातच अतोनात खर्च करून कष्टाने जागविलेल्या पिकात मागील काही दिवसांपासून इटकूर, शिराढोन, लोहटा पूर्व व पश्चिम, खडकी आदी ग्रीन बेल्ट असलेल्या परिसरात रान डुकरांनी अक्षरशः हैदोस घातला असून प्रामुख्याने ऊस शेतीचे मोठे नुकसान केले आहे.

यामुळे वन विभाग काय झोपा काढत आहे काय? असे संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत असून नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून रान डुकराचे जत्थेच्या जत्थे उसाच्या फडात घुसून नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होत आहे.

शिराढोंन, खडकी, लोहटा पूर्व व पश्चिम, आदी ग्रीन बेल्ट असलेल्या परिसरात रान डुकरांचा उच्छाद वाढला आहे. रान डुकरांचे कळप उसाच्या फडात ठाण मांडून बसले आहे. यात ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यांनी शेतातच मुक्काम ठोकला आहे.

रान डुकरामुळे ऊसाचे प्रचंड नुकसान होत आहे. डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडे काहीच उपाययोजना उपलब्ध नाहीत. अशा प्राण्यांना ठार मारण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे.
-दत्ता फरताडे, वन अधिकारी धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT