Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीसदृश पावसामुळे पिके मातीमोल

प्रामुख्याने मालेगाव, सटाणा, येवला, चांदवड, देवळा व निफाड तालुक्यांमध्ये दाणादाण उडाली आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतकरी मजूर उपलब्ध करून सोंगणीच्या तयारीत आहेत.

टीम ॲग्रोवन

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश (Heavy Rainfall) पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. प्रामुख्याने मालेगाव, सटाणा, येवला, चांदवड, देवळा व निफाड तालुक्यांमध्ये दाणादाण उडाली आहे. खरीप हंगाम (Kharif Season) अंतिम टप्प्यात असून शेतकरी मजूर उपलब्ध करून सोंगणीच्या तयारीत आहेत;

मात्र पाऊस शेतकऱ्यांना कामे करू देईना आणि दुसरीकडे शेतातील पिकेही राहू देईना, अशीच स्थिती जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिके मातीमोल होत असल्याने हंगाम वाया जाण्याची स्थिती आहे. मंगळवारी (ता. ११) जिल्ह्यात दुपारनंतर सटाणा, मालेगाव, येवला, देवळा या भागांत पावसाला सुरुवात झाली.

त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील दाभाडी परिसरात अतिवृष्टी झाली. या भागात जिल्ह्यातील सर्वाधिक ७१ मिमी पावसाची नोंद झाली. तर तालुक्यात सौंदाने परिसरात पवसाचा जोर कायम होता. चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामध्ये दिघवद येथे ६५ मिमी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

निफाड तालुक्यातील रानवड, लासलगाव, सायखेडा परिसरात पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यांच्या पश्चिम व पूर्व भागात ननाशी व मोहाडी भागात जोरदार पाऊस झाला. येवला तालुक्यातील अनेक गावे पावसामुळे प्रभावित झाली. एकीकडे संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होत आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजारी ही पिके पावसात भिजल्याने ती काळ्या पडल्याने प्रतवारी संपुष्टात आली आहे. त्यामुळे मोठा फटका बसला आहे. लेट खरीप कांदा लागवडीचे नियोजन असताना रोपवाटिका खराब झाल्या आहेत.

तर काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. त्यामध्ये बियाणे वाहून गेल्याने नियोजित कामे विस्कळीत होणार आहे. सटाणा तालुक्यात करंजाडी खोऱ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेली मिरची लागवड, कोथिंबीर वाहून गेली आहे.

याशिवाय निफाड, दिंडोरी, नाशिक, चांदवड, सिन्नर या तालुक्यांत द्राक्ष छाटणी कामे अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. शेतात सातत्याने पाणी साचून भाजीपाला राहिल्याने टोमॅटो, मिरची, कोबी या पिकांना करपा व बुरशीजन्य रोगांचा विळखा वाढला आहे. त्यामुळे शिवारात असलेली पिके मातीमोल झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पूर्व भागात मालेगाव, नांदगाव तालुक्यात कापूस संततधार पावसात भिजून खराब होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विर्दभात पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Microbial Soil Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीव महत्त्वाचे

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT