Crop Loan Scheme
Crop Loan Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचे वाटप करावे

Team Agrowon

Pune News : भोर तालुक्यातील जे शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सभासद झालेले नाहीत, त्यांना सभासद करून पीककर्ज वाटप करावे. तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या सभासदांना त्वरित पीककर्ज वाटप करावे, अशा सूचना सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी केल्या आहेत.

आपटी (ता. भोर) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत रायरेश्‍वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था रायरीच्या सभासदांना पीककर्ज वाटपाचा प्रारंभ सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. १५) करण्यात आला.

या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नावजी किंद्रे, बँकेचे विभाग प्रमुख सुदाम पवार, वसुली अधिकारी विनोद काकडे, विकास अधिकारी श्‍याम घोणे, शाखा प्रमुख बाळासाहेब मोरे, सूर्यकांत किंद्रे, शंकर शिंदे, आनदा कंक, चंद्रकांत पिसाळ, अशोक खोपडे, रामदास जेधे, अनिल जेधे, सोपान कुडले, शंकर भोजने, विठ्ठल पारठे आदि सभासद उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी विनोद काकडे म्हणाले, की भोर तालुक्यात पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून २०२३- २४ वर्षासाठी भोर तालुक्यातील १४ हजार शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेकडून खरीप व रब्बी हंगामातील ऊस, भात, टोमॅटो व कांदा या पिकांना ९ हजार ७६३ हेक्टरसाठी १२५ कोटी रुपये कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट असून, या वेळीही भोर तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पीककर्ज वाटप होईल.

सध्या आपटी, आंबवडे, किकवी, कापूरहोळ, न्हावी या शाखांत पीककर्ज वाटप करण्यास सुरुवात झाली असल्याचे विभागीय अधिकारी सुदाम पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT