Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : रब्बीत २१६ कोटींचे पीककर्ज वाटप

अपेक्षित गती नाही : ५६३ कोटी वाटपाचे उद्दिष्ट

Team Agrowon

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामाानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) ५६३ कोटी ८१ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजपर्यंत जिल्ह्यात राष्ट्रीय तसेच ग्रामीण बँकांकडून २७ हजार ७६ शेतकऱ्यांना २१६ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप (Crop Loan) केले आहे. यात ग्रामीण बँक तसेच व्यापारी बँकांकडून प्रत्येकी ३८ टक्के कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात एक हजार ५८१ कोटी ५९ लाख तर रब्बी हंगामात ५६३ कोटी ८१ लाख असे एकूण दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. दरम्यान खरीप हंगामात ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४ टक्क्यांनुसार एक लख ९४ हजार ७९२ शेतकऱ्यांना एक हजार ४९२ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. यानंतर आक्टोबरपासून रब्बीसाठी पीककर्ज वाटप करण्याचे काम सुरू झाले. यात रब्बी हंगामासाठी ५६३ कोटी ८१ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु २६ डिसेंबरपर्यंत २७ हजार ७६ शेतकऱ्यांना २१६ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. यात ग्रामीण बँकेकडून चार हजार २१९ शेतकऱ्यांना ३२ कोटी ५३ लाखांनुसार ३८.८६ टक्के कर्जवाटप केले आहे. तर राष्ट्रीय बँकेकडून २२ हजार ८५७ शेतकऱ्यांना १८४ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप केले आहे. याचे एकूण प्रमाण ३८.८६ टक्के असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT