Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Wet Drought : एरंडोलला ओला दुष्काळ जाहीर करा

एरंडोल विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

टीम अॅग्रोवन.

एरंडोल : एरंडोल विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत शासनाने त्वरित दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण याना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी मोर्चात राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दानवे यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर आक्रमक भाषेत टीका केली. स्वार्थासाठी एकत्र आलेलेल शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले असून, त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप केला.

शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून देखील शासन अद्याप शेताच्या बांधापर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप केला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाही. शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. या वेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण यांना शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी

तालुक्याची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी लावण्यात यावी, मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ, संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील

युवासेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी, जिल्हा समन्वयक अतुल महाजन, जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, शहरप्रमुख कुणाल म्हजान, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, प्रा. आर. बी. पाटील, जिल्हापरिषद सदस्य नाना महाजन सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSRTC Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? वेतनाबाबत प्रताप सरनाईकांचे प्रशासनाला आदेश

Drought Inspection : दुष्काळाची भीषणता: आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी!

Drought Affects Area: पुरंदर तालुक्यात २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाची झळ

Drought Crisis : पशुधनावरही दुष्काळाचे सावट! चाऱ्याअभावी जनावरांचे हाल; शेतकरी हवालदील

Akole Mumbai Long March: शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी लाल वादळ मुंबईच्या दिशेने! अकोले- मुंबई लाँग मार्च सुरु

SCROLL FOR NEXT