Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अकोल्यात वादळी वारा, पावसामुळे पिकांचे नुकसान

तेल्हारा तालुक्यात हिवरखेड, दानापूर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसला.

Team Agrowon

Akola News या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा नैसर्गिक आपत्तीला (Natural Calamity) सामोरे जावे लागले. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी मोठ्या प्रमाणात वादळी वारा, पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. घरांवरील पत्रे उडून गेले. प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद या तालुक्यांत वादळाचा जोरदार तडाखा बसला.

तेल्हारा तालुक्यात हिवरखेड, दानापूर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसला. अचानकच आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात असलेला कांदा, गहू, टरबूज या पिकांचे मोठे नुकसान झाले. हिवरखेड- सोनाळा मार्गावर वारखेड फाट्याजवळ एक मोठे बाभूळचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली.

संग्रामपूर तालुक्यात टुनकी भागात वादळाने धुमाकूळ घातला. यामुळे झाडे पडली. ६० ते ७० घरांवरील पत्रे उडून गेली. जामोद परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कांदा पीक मोठ्या प्रमाणात भिजले. शेगाव तालुक्यातही पावसाने धुमाकूळ घातला.

बुलडाणा तालुक्यातील धाड व डोमरुळ परिसरात अचानक वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मका, हरभरा सुड्या भिजल्या. लोणार तालुक्यात बाबूलखेड येथे वसंतराव श्रीराम हाडे यांच्या गोठ्यावर वीज पडून बैलजोडी ठार झाली. अकोला व परिसरात रात्री जोरदार वादळाने नागरिकांची धांदल उडाली. रात्री उशिरापर्यंत हे वादळ सुरूच होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT