Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : परतीच्या पावसाचे दणके सुरूच

मराठवाड्यात परतीच्या पावसाचे दणके सुरूच आहेत. गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत बीड लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ मंडलांत अतिवृष्टी झाली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाचे दणके सुरूच आहेत. गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत बीड लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ मंडलांत अतिवृष्टी (Wet Drought) झाली. पावसाचे हे परतीचे आक्रमण काढणीला आलेल्या पिकांच्या (Crop Damage) मुळावर उठल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४३ मंडलांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कन्नड, चापानेर व चिकलठाण मंडलात पावसाचा जोर थोडा अधिक होता. इतर मंडलात पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरूपाची होती. जवळपास २२ मंडलांत मात्र पावसाने उसंत घेतली. गत काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात तुफान बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मात्र उसंत घेतल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यातील ४९ पैकी केवळ ९ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील बहुतांश मंडलात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील ६३ पैकी २९ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. धारूर तालुक्यातील मोहखेड मंडलात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील परळी तालुक्यात पावसाची उसंत होती. तर माजलगाव, गेवराई, बीड तालुक्यातील अनेक मंडलांतही पाऊस झाला नाही.

लातूर जिल्ह्यातील ६० पैकी १४ मंडलांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील मुरुड मंडलात अतिवृष्टी झाली. इतर मंडलांत झालेला पाऊस तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाचा होता. जिल्ह्यातील चाकूर, जळकोट, उदगीर, निलंगा आदी तालुक्यांतील मंडलात पावसाने उसंत घेतली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २९ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील जागजी व इटकळ मंडलात अतिवृष्टी झाली. वाशी भूम व परंडा तालुक्यांत पावसाची हजेरी नसल्यात जमा होती.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमिटरमध्ये)

औरंगाबाद जिल्हा : बालानगर १७.५, तुर्काबाद १८.३, वैजापूर २३, कन्नड ३७.८, चापानेर ३७.८ , चिकलठाणा २३.५

जालना जिल्हा : शेवली २०.८, बदनापूर १५.८, पांगरी १८.८

अतिवृष्टीची मंडल

(पाऊस मिलिमीटरमध्ये)

बीड जिल्हा

मोहखेड ८१

लातूर जिल्हा

मुरुड ६७.५०

उस्मानाबाद जिल्हा

जागजी ८६

इटकळ ९०.७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून मिळाली शाश्‍वती

Livestock Management: उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य

Poultry Farming: देशी कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

Farm Productivity: उत्पादकता वाढली तर भाव पडतील?

SCROLL FOR NEXT