Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला

टीम ॲग्रोवन

उपळाई बुद्रुक ः परतीच्या पावसाने गेली आठवडाभर माढा, करमाळा, बार्शीसह इतर काही तालुक्यांमध्ये धुमाकूळ (Heavy Rainfall) घातला आहे. काही भागात तर ढगफुटीसदश (Rain Like Cloudburst) स्थिती होती. त्यामुळे या भागांमध्ये हाहाकार माजला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया (Crop Damage) गेली आहेत.

पावसाच्या प्रवाहाबरोबर शेतातील माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील महादेव पांडुरंग गोरे या शेतकऱ्याच्या द्राक्षेची तसेच केळीची संपूर्ण बाग पाण्यात असून मकेच्या पिकाचा सुपडासाफ झाले आहे. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

या भागातील अनेक शेतकऱ्याचे सोयाबीनचे पिकांचे नुकसान झाले आहे. तर उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, रोपळे खुर्द, वडाचीवाडी या भागातील डाळिंब, द्राक्ष बागायतदारांना या परतीच्या पावसाचा मोठा झटका बसला आहे नुकसानीबरोबर विविध रोगांचा प्रादुर्भाव या बागायतदारांना आता सतावत आहे.

शेतातील पाणी कमी व्हायच वातावरण दिसत नसून काही तास पावसाची विश्रांती मिळाली की, पुन्हा पावसाची संततधार सुरू असल्याने बळीराजा हैराण झाला आहे. ज्या शेतातील पिकांवर भविष्यात आर्थिक उलाढाली केलेल्या आहेत.

त्याचे नियोजन पूर्णपणे विस्कळित झाल्याने कर्जबाजारी होण्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई करावी, अशी मागणी होत आहे.

माढा तालुक्यातील ज्या भागात अतिवृष्टी झालेली आहे, तिथे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. नुकसानीचा हा अहवाल शासनाला पाठविण्यात येईल.
राजेश चव्हाण, तहसीलदार माढा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT