Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Hailstorm : नाशिक जिल्ह्यात पिकांना तडाखा

सटाणा, मालेगाव तालुक्यांत शनिवारी (ता.८) दुपारी साडेतीननंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच गारपिटीने दाणादाण उडविली.

Team Agrowon

Nashik News सटाणा, मालेगाव तालुक्यांत शनिवारी (ता.८) दुपारी साडेतीननंतर वादळी वाऱ्यासह पावसाने (Nashik Rainfall) हजेरी लावली. तसेच गारपिटीने (Hailstorm) दाणादाण उडविली. ऐन सुगीच्या दिवसांत पुन्हा शेतकऱ्यांच्या कष्टाची अस्मानी संकटाने माती केली आहे.

यामध्ये उन्हाळ कांद्यासह गहू, हरभरा, डाळिंब, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव तालुक्यात गारपिटीने कांद्याला मोठा फटका बसला आहे. मका पीक आडवे झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा उध्वस्त झाला आहे.

सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे, आखतवाडे, बिजोटे, आसखेडा, निताने, भुयाने परिसराला गारपिटीने झोडपले. अनेक भागात गारांचा खच साचला. १५ मिनिटे झालेल्या जोरदार गारपिटीमुळे सबकेन झालेल्या द्राक्ष बागांचे तर काढणीसाठी आलेल्या उन्हाळ कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.

पंचनामे करण्याची मागणी

कसमादे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, यासाठी तत्काळ यंत्रणेला सूचना देऊन पंचनामे करावेत, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भामरे यांनी केली.

नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस होऊन गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
- दादाभाऊ दाभाडे, शेतकरी, मानिकपुंज, जि. नाशिक.
वादळीवाऱ्यासह सुरवातीला अर्धा तास गारांचा पाऊस झाला. कांदा पिकास मोठा फटका बसला आहे. साठवलेल्या कांद्याच्या पोळीत पाणी घुसले
- किरण पवार, शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

SCROLL FOR NEXT