Haistorm Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Crop Damage : माण, खटावला गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Unseasonal Rain : माणच्या पश्चिमेकडील भागात शनिवारी वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. बोथे व शिरवलीला मोठा गारांचा वर्षाव झाला.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात गारपीट होण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (ता.१५) सांयकाळी माण, खटाव, खंडाळा तालुक्यांत काही ठिकाणी मोठी गारपीट (Hailstorm) झाली.

जिल्ह्याच्या इतर भागातही विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने कांदा, आंबा, कडबा भिजून मातीमोल झाला. या पावसाने फळ बागायतदार व कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणले.

माणच्या पश्चिमेकडील भागात शनिवारी वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. बोथे व शिरवलीला मोठा गारांचा वर्षाव झाला. मलवडी, सत्रेवाडी व भांडवली यांना वळिवाने झोडपून काढले. गाडेवाडी या कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या वाडीत साधारण ४० एकर कांदा काढून ढीग रचून ठेवले होते.

मुसळधार पावसाने या ढिगांखालून पाणी वाहिले. त्यामुळे भिजलेले कांदे नासून मोठे नुकसान होणार आहे. शिंदी खुर्द, भांडवली, सत्रेवाडी या ठिकाणी लावलेल्या ऐरणी खालून पाणी वाहिले. त्यामुळे या ऐरणीतील कांदा सुद्धा नासण्याची शक्यता आहे.

खटाव तालुक्यातील पुसेगाव, बुध, रणसिंगवाडी, वेटणे, वेटणे ओढा, काटेवाडी परिसरात गारपिटीने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या वर्षी कांद्याला बाजारभाव नाही. त्यातच हा तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला. काढणीस आलेल्या कांदा पिकाबरोबरच डिस्कळ परिसरातील चिकू, आंबा आदी फळबागांची मोठी हानी झाली.

खंडाळ्यात आंबा, कांद्याचे नुकसान

खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या असवली, कण्हेरी, जवळेसह परिसरातील गावांत आंब्यासह कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले. कोरेगाव तालुक्यातील जळगाव व खटाव तालुक्यातील शिरसवडीत वीज पडून नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT