Cow Hug Day Agrowon
ताज्या बातम्या

Cow Hug Day : ‘गाय अलिंगन दिवस’ टीकेनंतर अखेर मागे

समाज माध्यमांवरिल प्रचंड टीकेनंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी (ता. १४) ‘गोमाता अलिंगन दिन’ साजरा करण्याचा घेतलेला निर्णय केंद्रीय पशु कल्याण मंडळाने अखेर मागे घेतला.

Team Agrowon

Cow Hug Day पुणे ः समाज माध्यमांवरिल प्रचंड टीकेनंतर व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी (ता. १४) ‘गोमाता अलिंगन दिन’ (Cow Hug Day) साजरा करण्याचा घेतलेला निर्णय केंद्रीय पशु कल्याण मंडळाने अखेर मागे घेतला. या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तर समाज माध्यमांवर यावरून प्रचंड टीका आणि विनोद झाले होते.

केंद्रीय पातळीवर शासकीय संस्था मंडळाने गाईला अलिंगन देण्याचे आवाहन करण्याचा विचित्र निर्णय घेतला होता.

या निर्णयानंतर समाज माध्यमांवर काही कार्यकर्ते गाईला अलिंगन देण्यासाठी गेले असता, गाईने दोन वेळा लाथ मारल्याची चित्रफित समाज माध्यमांवर धडकली.

यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि विनोद झाल्यानंतर अखेर पशु कल्याण मंडळाने हा निर्णय मागे घेत असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले.

पशु कल्याण मंडळाने केलेल्या आवाहनात पाश्चात्य संस्कृतीमुळे वैदिक परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने म्हटले होते.

‘प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा-१९६०’ च्या कलम ४ अंतर्गत १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे मंडळ पशु कल्याण संस्थांना अनुदान देते आणि केंद्राला प्राणी कल्याण समस्यांवर सल्ला देण्याचे काम करते.

केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी केलेल्या आवाहनानंतर ‘गो माता अलिंगन’ दिनाचा मुद्दा पुढे आला होता. आपल्या देशात गाईंची पूजा करण्याची जुनी परंपरा असून लोक गाईला आलिंगन देतात ही आनंदाची बाब आहे.

त्यामुळे गो आलिंगन दिनाच्या आमच्या आवाहनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही रूपाला यांनी पत्रकारांना सांगितले होते; मात्र या निर्णयावर टीका झाल्यानंतर अखेर निर्णय मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT